top of page

Special Articles

HIV

HIV/AIDS याचे वर्णन आयुर्वेदात आहे की नाही असा विचार करत बसण्यापेक्षा घडणा-या घटनांवरून चिकित्सा करणे हे योग्य ठरते- कर्मावरून- शरीरात कोणते द्रव्य गेले असले पाहिजे आणि त्याने कसे कसे उपद्‍व्याप केले असले पाहिजेत याचे अनुमान करता येते. व त्याप्रमाणे आयुर्वेदातील तत्त्वांच्या चिकित्सा आधारे चिकित्सा करता येते. येथे चिकित्सा करत असताना शोष, राजयक्ष्मा, उपदंश व प्रमेह व्याधी त्याची लक्षणे चिकित्सा व शरीरावर होणारे परिणाम यांचा विचार करून (HIV) चे उपचार, औषधीद्रव्य व आहारविहार पथ्यापथ्यादि योजले आहेत.

आयुर्वेद आऊटडेटेड ? मुळीच नाही .1

गेल्या दोन-तीन दशकांत जगभर निरनिराळ्या वैद्यक प्रणाली प्रकाशझोतात येणे हेच मुळी सध्याच्या मान्यवर वैद्यक प्रणालीमधील कमीपणा ,दुर्गुण किंवा अजून बरंच काही न समजलेलं आहे हे त्याचे द्योतक आहे. चीन स्वतःच्या अशा चायनीज मेडिसिनचा स्वतःचे वैद्यक शास्त्र म्हणून पुरस्कार करते. भारताला मात्र आयुर्वेद हे भारतीय वैद्यक शास्त्र आहे हे म्हणावेसे वाटत नाही हे आमचे मोठे दुर्दैव आहे.

आयुर्वेद आऊटडेटेड ? मुळीच नाही .2

आयुर्वेदातील पायाभूत कल्पना चुकीच्या आहेत का?

चार हजार वर्षापूर्वीच्या ज्ञानाचा विचार केला तर तसे वाटण्याचे मुळीच कारण नाही कारण काहीतरी गृहीत धरूनच पुढे जावे लागते शून्य गृहीत धरले तेव्हा त्याची पुढे एक झाली माणसाची उत्पत्ती कशी झाली त्यासाठी एडम व अवतार घ्यावा लागला आणि नंतर शास्त्राची प्रगती होत गेली तशी अनेक गोष्टींची उकल होत गेली.

आयुर्वेद आऊटडेटेड ? मुळीच नाही .3

आयुर्वेदात शल्यतंत्र नावालाही नाही ?

खरं तर तसं नाही. जेव्हाआयुर्वेद लिहिला गेला चिकित्सा म्हणून त्याची योजना झाली त्यावेळची उपलब्धता संमोहन शास्त्राचा अभाव शरीररचना व शरीरक्रिया याबाबतची अपुरी माहिती त्रुटी यांचा विचार केला तर आयुर्वेद आणि खुप खुप ऑपरेशन्स वर्णन केली आहेत.

आयुर्वेद आऊटडेटेड ? मुळीच नाही .4

पंचकर्म व विशेषतः रक्तमोक्षण अघोरी उपचार आहेत का?

शिक्षित माणसाने हे उपचार केले तर नक्कीच नाहीत.भूलतज्ञ याच्या हातून रुग्ण मरतो ,शस्त्रकर्म करताना किंवा नंतरही रुग्ण करू शकतो.प्रत्येक वेळी चिकित्सा करणार्‍यांची चुक असते असे नाही.या गोष्टी रुग्ण सापेक्ष ही असतात.रक्तमोक्षाच्या बाबतीतही असेच म्हणता येईल.

आयुर्वेद आऊटडेटेड ? मुळीच नाही .5

हेवी मेटल्स व आयुर्वेद

कालानुसार चिकित्सेच्या उपक्रमात बदल होत असतात हे मी मागेच सांगितले आहे.मेटल्स , रत्ने , माणके ही आयुर्वेद शास्त्रात रसशास्त्र या शाखेमध्ये नंतर आली. ही औषधी खालील कारणांमुळे व्यवहारात आली. काढे, चूर्णांपेक्षा ती घेण्यास सोपी , चवीला बरी ,मात्रा थोडी ,खराब होण्याकडे प्रवृत्ती नाही, उपलब्धता मुबलक व आयडेंटिफिकेशनला अडचण नसलेली आहेत .

आयुर्वेद आऊटडेटेड ? मुळीच नाही .6

आयुर्वेद कायाकल्प- रसायन - वाजीकरण

चरकाचार्यांनी चार हजार वर्षांपूर्वी वातावरणात होणारे बदल व प्रदूषण याबद्दल लिहिले आहे. खरंतर प्रदूषणाला तेव्हा पासूनच सुरुवात झाली आहे. चरकाचार्यांनी मनुष्याचे आयुष्य शंभर वर्षाचे दिलेले आहे. हा आकडा त्यांनी एकशे पंचवीस वर्ष जगणारी माणसे व ऐंशी नव्वद वर्ष जगणारी माणसे यांच्या सरासरीतून अदमासे सांगितल्याची म्हणतात. ते म्हणतात माणसाचे शंभर वर्षाचे आयुष्य हे स्वस्थ (रोग रहित) आयुष्य आहे.

bottom of page