top of page

Kayachikitsa

HIV

HIV/AIDS याचे वर्णन आयुर्वेदात आहे की नाही असा विचार करत बसण्यापेक्षा घडणा-या घटनांवरून चिकित्सा करणे हे योग्य ठरते- कर्मावरून- शरीरात कोणते द्रव्य गेले असले पाहिजे आणि त्याने कसे कसे उपद्‍व्याप केले असले पाहिजेत याचे अनुमान करता येते. व त्याप्रमाणे आयुर्वेदातील तत्त्वांच्या चिकित्सा आधारे चिकित्सा करता येते. येथे चिकित्सा करत असताना शोष, राजयक्ष्मा, उपदंश व प्रमेह व्याधी त्याची लक्षणे चिकित्सा व शरीरावर होणारे परिणाम यांचा विचार करून (HIV) चे उपचार, औषधीद्रव्य व आहारविहार पथ्यापथ्यादि योजले आहेत.

Sandhivaat

संधिवात म्हणजे संधिशूल असाच अर्थ अनेकवेळा केला जातो पण मला असं वाटतं की तो तसा मर्यादित न घेता वायूने अस्थि, मज्जा , व संधि हे ज्या ठिकाणी शरीरात एकत्र येतात त्याठिकाणी निर्माण केलेले उत्पात.या उत्पातात शूल हे लक्षण प्रमुख असते.

अर्बुद 

आयुर्वेदांत उंचवटाउंच असे तीन व्याधी प्रामुख्याने वर्णन केले आहेत ते म्हणजे ग्रंथी, गुल्म व अर्बुद. या खेरीज व्रणाशोथ व विद्रधी यांचेही वर्णन आयुर्वेदांत आहे. त्यापैकी व्रणशोथ व विद्रधी हे आशुकारी स्वरुपांत प्राधान्याने सापडतात. त्याचे निदान वा चिकित्सेतही अडचण येत नाही. गुल्मामध्ये मात्र रक्तगुल्म हा संदेह निर्माण करणारा आहे.

   स्वाइन फ्लू (H1N1)- नवीन त-हेचा फ्लू सात दिवसांचा संततज्वर 

या व्हायरस चा शोध अमेरिकेमध्ये एप्रिल २००९ मध्ये लागला. त्याच वेळी याच प्रकारच्या ‘फ्लू’ ने आजारी माणसे मेक्सिको व कॅनडातही आढळली. या नवीन फ्लूची लागण झाल्यानंतर या रुग्णाची रक्ताची तपासणी केली त्यावेळी त्यांना एक नवाच व्हायरस सापडला. हा व्हायरस ज्या व्हायरस मुळे डुकरांना ‘फ्लू’ होतो त्यासारखा होता म्हणून त्याला शास्त्रज्ञांनी Swine flu असे नाव ठेवले पण पुढे अधिक संशॊधनात हा व्हायरस अगदी नवीनच असल्याचे आढळले व त्याला नाव दिले Novel H1N1 Flu.

रसायन व (HIV) पीडित रुग्णांसाठी चिकित्सा

जनपदोध्वंस सुरू झाल्यानंतर ज्या चार महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत त्यातील पंचकर्म व रसायनाची जबाबदारी मुख्यतः वैद्याची. HIV विषाणू पीडित रुग्णांमध्ये सुरवातीला लक्षणे उत्पन्न होतात ती रक्तवह स्रोतोदुष्टीची- आणि म्हणून ज्यावेळी पंचकर्माचा मी विचार करतो त्यावेळी माझ्या पुढे दोनच कर्मे येतात ती म्हणजे विरेचन व रक्तमोक्षण – व्यवहारतः व करावयास सुटसुटीत.

bottom of page